Lions District 3234D2 2019-20


About Us
About District 3234-D2

  WELCOME TO OUR WEBSITE OF VIBRANT LIONS CLUBS DISTRICT 3234-D2.

      “Lions Clubs International” and all members of our vibrant Lions Clubs District, 3234-D2. welcome you to our UNITED WE STAND TOGETHER WE SERVE website. Your journey through the pages is made extremely simple with distinct information about our organization and its administrative functioning.

      Lions Clubs International being ‘The Largest Social Organization’ in the world has its strength derived from Inherent principals of “Service to the mankind” and “Friendship”. Information regarding our representation in countries on this Earth, our purpose of existing and our moral and ethical ground of progressing. Also a basic knowledge of our hierarchy and the structure. Our way of doing social works and also reporting there after. Our dignified members are our real asset and so all information regarding their training and transforming them into a responsible and useful sole for our own society.

      Also proper reporting of each individual member is also shared with you all. Our journey with our motto “WE SERVE THROUGH DIVERSITY” is almost a century old now, leaders and members from different creed, cast and languages have till date contributed to the prosperous march forward and for you there are pages with glorious history of past also. We not only thank you for your safari to our web site but we are sure the Information / Knowledge Bank we are sharing with you shall certainly make you think and influence to be a part of our organization if you are not a member yet.

       

      Thank you and happy viewing.

      District Governor,

      2019-2020

      MJF Lion Omprakash Pethe

      UNITED WE STAND TOGETHER WE SERVE

DG Team

  MJF Lion Omprakash Pethe
           District Governer

   

                                            

   MJF Lion Abhay Shastri                                                MJF Lion Hemant Nike
   1st Voice District Governor                                               2nd Voice District Governor

Governor

  नमस्ते,
    प्रिय लायन्स मित्रांनो सर्वप्रथम आपणास  1 जुलै पासून सुरू होणाऱ्या नवीन लायन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा.
  मित्रांनो डिस्ट्रिक्ट 3234-D2 च्या प्रांतपाल या नात्याने आपल्या प्रांताची सूत्रे हाती घेताना मला अतिशय आनंद होत आहे, तुम्हाला माहीतच आहे की मी पहिल्या दिवसापासून एकच  ध्येय व नीती अंगिकारली आहे ती म्हणजे "हम सब साथ है " UNITED WE STAND TOGETHER WE SERVE
  हा एकजुटीचा नारा घेऊनच आपल्याला लायनिझम चा वसा पुढे चालवायचा आहे.
  आपल्या प्रांतामधील सर्व क्लब चे अध्यक्ष , सचिव व खजिनदार म्हणजे PST टीम चे प्रथमतः अभिनंदन  व माझ्या शुभेच्छा,
  तुमच्या येत्या वर्षातील कामगिरीच्या जोरावरच आपल्या प्रांताला तुम्ही  एक नवीन ओळख निर्माण करून देणार आहात.
  SERVICE WITH CELEBRATION
   "उत्सव साजरा करतानाच सेवा करा किंवा सेवा करताना उत्सव साजरा करा" हे  घोष वाक्य भरपूर विचार मंथन करून  निवडले आहे,  जेणे करून सर्व लायन्स मित्रांना लायनिजम चे कार्य करीत असताना आपणास सेवा कार्य करण्याची प्रेरणा व त्या सेवेतून आनंद  मिळावा हीच माझी मनोमन इच्छा  आहे.
   आपण स्वताचा, पत्नीचा मुलांचा ,जन्म दिना बरोबरच लग्नाचा वाढदीवस ही साजरा करित असतो आणि सोबत  वर्ष भर आपल्या धार्मिक परंपरा जपत सण व उत्सव ही साजरा करीत असतो ह्या सर्व गोष्टीतून आपल्याला जो आनंद मिळतो तो  आनंद उत्सव साजरा करताना सोबत सेवा कार्याचीही जोड द्यावी ही आग्रहाची विनंती मी आपणास करेन , तरच आपण आपल्या  घोष वाक्याला  यथोचित न्याय देऊ शकू.
   मित्रहो तुम्हास माहिती आहेच की  "WE SERVE THROUGH DIVERSITY"  हे इंटरनॅशनल प्रेसिडेंट यांचे घोष वाक्य आहे, लायन्स चे जे प्रमुख सेवा कार्य आहेत मधुमेह, दृष्टी, भुक, पर्यावरण, लहान मुलांचा कॅन्सर , (5 Global Causes  VISION, DIABETES, CHILDHOOD CANCER, HUNGER, ENVIRONMENT) ह्या वर जागतिक पातळीवर प्रचंड काम चालू आहेच , ह्या सेवा कार्यासोबत  आपल्या प्रांताच्या वर्षभरासाठी चार सेवा कार्यात झोकून देण्याची  सर्व लायन्स बंधू भगिनींना मी आग्रहाची विनंती करेन  . आपन आपले  तन, मन ,व धन द्वारे  प्रत्येक क्लब मध्ये सेवा कार्य करण्याची चढाओढ लागलेली नक्कीच दिसेल यात मला काही शंका नाही.
     पाणी बचत हे आपल्या सेवा कार्यात प्राधान्याने असेल, यानंतर कौशल्य विकास, अवयव दान, व शेवटी सुदृढ ह्रदय (Water conservation, Skill development, Organ Donation, and Healthy Heart.)
    मित्रानो आपले स्वतःचे कुटुंब व्यवसाय व सेवा कार्य करण्यासाठी निरोगी मन व सुदृढ शरीर सांभाळणे खूप गरजेचे आहे, कारण
  हीच आपली खरी संपत्ती आहे. आपण  तिची रोज मशागत केली तर वरील सर्व सेवा कार्य करण्यास तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही.
  मी माझ्या लायन्स क्लब ऑफ पुणे  आकुर्डी व प्रांतातील  क्लब च्या सर्व सभासदांचा  आभारी आहे की त्यांचा भक्कम पाठिंबा माझ्या मागे तर आहेच यासह  सर्वांचा उत्साह ही द्विगुणित झालेला आहे.
  आपल्या डिस्ट्रिक्ट 3234-D2 ची पताका आपण भारतभर तर उंच नेणाराचं आहोत त्याबरोबरच जागतिक पातळीवर वर ही आपण सर्व लायन्स  मिळून आपला प्रांत उल्लेखनीय कार्य करून उच्च शिखरांवर नेऊन ठेवू या,  हीच आशा व्यक्त करतो,
  जाताना संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पसायदानातील काही ओळी उधृत करतो

  जे खळांची व्यंकटी सांडो ।
  तया सतकर्मी रती वाढो।
  भुता परस्परे पडो मैत्र जिवांचे
  दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्म सुर्ये पाहो।
  जो जे वांच्छील। तो ते लाहो प्राणिजात ।।
   
    "Emparer Service with Celebration"   ह्या पुस्तिकेद्वारे तुमच्याशी संवाद साधताना मला मनस्वी आनंद झाला.
  ह्या पुस्तिके करिता आपले सह्याद्री लायन्स चे मुख्य संपादक व प्रसिद्धी प्रमुख
  लायन राजेश शर्मा व त्यांचा टीमचे अभिनंदन व धन्यवाद

  जय लायन्यानीझम
  लायन ओमप्रकाश पेठे
  प्रांतपाल (2019-20)