Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
District Activities
Distribution spectacles

PIMPLE GURAV PUNE  April 24,2024

   3 Distribution spectacles-लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणी तर्फे शालेय विद्यार्थ्यांना चष्मे चे वाटप बुधवार दिनांक 24-04-24 रोजी लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणीतर्फे PCMC शाळा क्र. ५४, पिंपळे गुरव , येथे ५० शालेय विद्यार्थ्यांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. या शाळे मध्ये क्लब तर्फे 21 मार्च 2024 ला YCM च्या डॉक्टर्स टीम कडून नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले होते व त्यामध्ये जवळपास ५० विद्यार्थ्यांना चष्म्याची गरज असल्याचे आढळून आले. विषय तज्ञ ढोरे मॅडम कडून ला. शिवाजी माने सर मार्फत क्लब ला विनंती केली होती की लायन्स क्लबने हे चष्मे बनवून द्यावे. व क्लब ने तत्परता दाखवत लगेच गरजेनुसार चष्मे तयार करून घेतले. यावेळी डिस्ट्रिक्ट चेयरपर्सन ( व्हिजन) एम जे एफ ला. हर्ष नायर सर यांनी विद्यार्थी आणि उपस्थित पालक याना लायनिजम बद्दल माहिती करून दिली तसेच क्लब चे अध्यक्ष ला. अमोल दापुरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी क्लब चे अध्यक्ष ला. अमोल दापुरकर, रिजन चेयरपर्सन एम जे एफ ला. धनराज मंघनानी ,डिस्ट्रिक्ट चेयरपर्सन एम जे एफ ला. हर्ष नायर *ऍक्टिव्हिटी चेयरपर्सन ला समिरजी अगरवाल, माजी अध्यक्ष ला. धीरज कदम ,ला. प्रमोद भोंडे, खजिनदार ला. शिवाजी माने ला. विक्रमसिंह शक्तावत,, पी. चिं. मनपा प्रशासकीय अधिकारी (शिक्षण विभाग) साबळे मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ साधना वाघमारे मॅडम, शिक्षक वाघमारे सर, अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणी टीम.