Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
District Activities
Women Empowerment

PIMPLE GURAV PUNE  October 21,2023

   शनिवार दिनांक २१-१०-२३ रोजी लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणीतर्फे *PCMC शाळा क्र. ५४, पिंपळे गुरव , येथे सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर व डिस्ट्रॉयर मशीन ची स्थापना रिजन चेयरपर्सन एम जे एफ ला. धनराज मंघनानी व झोन चेयरपर्सन एम जे एफ ला. दत्तात्रय संपकाळ यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. या मशीन चा लाभ शाळेतील जवळपास १५० मुलींना होणार आहे. यावेळी क्लब चे खजिनदार ला. शिवाजी माने सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मशीन बद्दल माहिती व मशीन वापरायचे प्रात्यक्षिक दिले. व डॉ प्रतीक्षा माने यांनी जवळपास १०० उपस्थित मुलींना मासिक पाळी यातील समज व गैरसमज समजावून सांगितले तसेच आरोग्याबद्दल सुद्धा माहिती दिली. यावेळी क्लब चे अध्यक्ष ला. अमोल दापुरकर, रिजन चेयरपर्सन एम जे एफ ला. धनराज मंघनानी* ,झोन चेयरपर्सन एम जे एफ ला. दत्तात्रय संपकाळ ऍक्टिव्हिटी चेयरपर्सन ला सुजाताताई चव्हाण, ला. प्रशांत गोमकाळे ला. प्रमोद भोंडे, ला. विक्रमसिंह शक्तावत, ला. अंजली दापुरकर, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वाघमारे सर, अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.